अभिनेता प्रसाद ओक हा नेहमी चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांपासून अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रात त्याच्या नावाचा डंका आहे. उत्कृष्ट अभिनय आणि चित्रपट करत असल्यामुळे प्रसादला प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळत आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्यासाठी २०२४ची सुरुवात खूप खास आहे. कारण या नवीन वर्षाची सुरुवात ओक कुटुंबाने नव्या घरातून केली आहे. नव्या घराची पहिलीच झलक प्रसादने नुकतीच दाखवली आहे.
अभिनेता प्रसाद ओकने काल, वर्षा अखेरीस आपल्या नव्या चित्रपटाची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती. “वर्षाच्या अखेरीस…नवी सुरुवात…नवा चित्रपट ‘रीलस्टार’”, लिहित प्रसादने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आज वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसादने आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात ओक कुटुंबाने नव्या घरातून केली आहे. नुकताच प्रसादने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला असून त्यातून नव्या घराची पहिली झलक दाखवली आहे.
प्रसादने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ओक कुटुंबाच्या नव्या घराचं प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे. तसेच घराबाहेरील आकर्षित नेमप्लेट दिसत आहे. डिस्टेंस इंडिकेटरवर ‘ओक ११०२/११०३’ असं लिहिण्यात आलं आहे. नवीन वर्षाची सुरुवात नव्या घरात होत असल्यामुळे प्रसादसह पत्नी मंजिरी ओक आणि दोन मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.