मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसेला ओळखले जाते. ती आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटात झळकली आहे. सध्या ती मालिका, चित्रपट यांपासून थोडी दूर आहे. मात्र एका व्हिडीओमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
नेहा पेंडसेने नुकतंच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी तिने काळ्या रंगाचा एक गाऊन परिधान केला होता. त्याबरोबरच तिने गळ्यात डायमंड नेकलेस आणि हातात त्याच रंगाची अंगठी परिधान केली होती. मात्र तिच्या या लूकमुळे ती ट्रोल झाली आहे.