हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. चपाती किंवा पराठा बनवण्यासाठी बहुतेक घरांमध्ये लोखंडी तव्याचा वापर केला जातो. कारण त्यावर रोटी किंवा चपात्या चांगल्या प्रकारे फुगून येतात. यासोबतच या तव्याची देखभालही सोपी आहे. बरेच लोक हा तवा रोज धुण्याऐवजी आठवड्यातून एकदाच धुतात. त्यामुळे तवा सतत वरच्या वर जळाल्यामुळे आणि नियमित साफसफाई न केल्याने त्यावर काळा थर साचतो. मात्र या उपायामुळे तुमचं हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे तेही तव्याला हात न लावता. @simplymarathi31 यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
- Advertisement -