झुरळांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही स्वयंपाकघराची सफाई करताना तुमच्या बेसीनची सफाई देखील करावी लागेल. तुम्ही म्हणाल बेसीन तर स्वच्छ असते त्याला साफ करायचे पण ते साफ करणे अत्यंत आवश्यक आहे कारण बेसीनच्या पाईपमधून झुरळ स्वयंपाकघरात शिरू शकतात. त्यामुळे तुम्हाला बेसीनची सफाई करावी लागेल.
सर्व कामे झाल्यानंतर तुम्ही बेसीन साफ करू शकता.
त्यासाठी तुम्हाला एक कांदा घ्या आणि अर्धा कापा
त्यावर मीठ टाकून संपूर्ण बेसीन घासा.
कांद्याचा रस सर्वत्र लागेल याची खात्री करा.
कांद्याच्या वासामुळे झुरळ बेसीनमधून स्वयंपाकघरात शिरणार नाही.
हा चिरलेला कांदा तुम्ही आठवडाभर वापरू शकता.