लग्नाचं घर म्हटलं की, प्रत्येक कार्यक्रमात एक आग्रह कायम केला जातो तो म्हणजे उखाणा घ्या. अगदी नव्या नवरीपासून ते सगळ्या विवाहितांना वेगवेगळ्या प्रसंगी आपल्या पतीचं नाव घेण्यासाठी आग्रह धरला जातो. अशावेळी अगदी कल्पक पण मजेशीर उखाणा घेतला तर मग तुमची त्या लग्नात किती चर्चा आणि प्रशंसा होणार हे काही नव्याने सांगायला नको. असाच आग्रह पूर्ण करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
@Jaya_Rathod या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या महिलेने यापूर्वी टाकलेल्या एका उखाण्याच्या रीलवर कोणीतरी कमेंट करून तुम्ही नाव घेताना सासु-सासऱ्यांचं नाव सुद्धा जोडलं असतं तर आणखी छान वाटलं असतं असं म्हंटलं होतं, त्याच कमेंटला उत्तर देताना या ताईने फक्त सासू- सासरे नव्हे तर घरातल्या सगळ्यांचं नाव अगदी खास पद्धतीने एकाच उखाण्यात गुंफून घेतलं आहे.