Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल ‘लग्न करा आज, पैसे द्या हप्त्याने’; विवाह मंगल कार्यालयाची जगावेगळी जाहिरात

‘लग्न करा आज, पैसे द्या हप्त्याने’; विवाह मंगल कार्यालयाची जगावेगळी जाहिरात

0

पूर्वी सोशल मीडियावर पुणेरी पाट्यांचीदेखील खूप चर्चा असायची. त्यावरील विनोदी आशय नेहमी व्हायरल व्हायचे. परंतु, अलीकडे शाळेतील मुलांच्या पेपरातील उत्तरं, पोस्टर हातात घेऊन सल्ले देणाऱ्या मुलांचे व्हिडीओ, गाड्यांच्या मागचे हटके डायलॉग, तसेच अतरंगी जाहिरातीचे पोस्टरही तितकेच चर्चेत असतात. अशातच आता एका जाहिरातीचा फोटो समोर आला आहे; तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल लोक घर, शिक्षण किंवा गाडी यांसाठी घेतलेले कर्ज हप्त्याने फेडतात. पण, तुम्ही कधी विवाह मंगल कार्यालयात केलेल्या लग्नाचे पैसे हप्त्याने फेडल्याचे ऐकलेय का? सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोद्वारे अशीच हटके जाहिरात केल्याचे दिसत आहे;
https://www.instagram.com/reel/C5nrN_rqctH/?utm_source=ig_embed&ig_rid=d16f7439-8957-428d-adc1-69d070176c43