Maruti Suzuki मारुती सुझुकीने नुकतीच सीएनजी पॉवरट्रेनसह Fronx SUV सादर केली आहे. सिग्मा आणि डेल्टा या दोन प्रकारांमध्ये या कारची विक्री केली जाईल. सिग्मा कारची किंमत 8.41 लाख रुपये तर डेल्टा खारची किंमत 9.27 लाख रुपये असणार आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. Frox CNG ही कार 28.51 kmpl चा मायलेज देईल, असा दावा मारुती सुझुकी कंपनीने केला आहे. फ्रँक्स सीएनजीची इंजिन पॉवर 1.2-लिटर, चार-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन आहे. हे 6,000 rpm वर 88.50 bhp चे कमाल पॉवर आउटपुट आणि 4,400 rpm वर 113 Nm चे पीक टॉर्क आउटपुट जनरेट करते. CNG वर चालू असताना, 6,000 rpm वर पॉवर आउटपुट 76 bhp पर्यंत कमी होतो आणि 4,300 rpm वर टॉर्क आउटपुट 98.5Nm पर्यंत कमी होतो. CNG पॉवरट्रेन केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.
- Advertisement -