Maruti Suzuki Invicto बाजारपेठेत सादर.. २५ हजार रुपयांमध्ये बुक करू शकता

0
44

Maruti Suzuki Invicto मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित ‘MPV Invicto’ अखेर बाजारपेठेत सादर केली आहे. सुझुकी आणि टोयोटा यांच्यात करार म्हणून तयार केलेली ही कार विद्यमान टोयोटा इनोवा हाय क्रॉसवर आधारित आहे. ६ एअरबॅग, टीपीएमएस, ३६०-डिग्री कॅमेर्‍यासह येते. Invicto तीन ड्राइव्ह मोडसह येते यात सामान्य, स्पोर्ट आणि इको आणि ९.५ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास वेग पकडू शकते. कंपनीचा असा दावा आहे की, ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये प्रति लिटर २३.२४ किमी प्रति लिटरचे मायलेज देऊ शकेल. कंपनीला या प्रीमियम MPV साठी ६,२०० पेक्षा जास्त प्री-बुकिंग्ज मिळाल्या आहेत. ग्राहका Invicto मॉडेल २५ हजार रुपयांमध्ये बुक करू शकतात. याची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे.