ज्ञानवापी मशिदीनंतर आता मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीचं वैज्ञानिक सर्वेक्षण केलं जाणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने यासंदर्भात दि. १४ डिसेंबर)व २०२३ रोजी महत्त्वाचा निकाल दिला. शाही ईदगाह मशीद ही कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आलेली आहे असा दावा करत हिंदू संघटनांनी या मशीद परिसराचं वैज्ञानिक सर्वेक्षण करून सत्य सर्वांसमोर आणावं अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मथुरा न्यायालयाने याप्रकरणी सर्वेक्षणास परवानगी दिल्यानंतर मुस्लीम पक्षकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आज उच्च न्यायालयानेही मशीद परिसराचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या खटल्यावर भाष्य करताना म्हटलं आहे की, काही लोकांनी कायदा आणि सुव्यवस्थेची थट्टा चालवली आहे.
ओवैसी म्हणाले, अलाहाबाद उच्च न्यायालयाने शाही ईदगाह मशिदीचं सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे. बाबरी मशीद खटल्याचा निकाल लागला तेव्हा मी म्हणालो होतो की संघ परिवाराच्या (आरएसएस) कुरापती वाढतील. मथुरेतला विवाद अनेक दशकांपूर्वी मशीद समिती आणि मंदिर ट्रस्टने आपसात सोडवला होता. काशी, मथुरा किंवा लखनौ कुठल्याही मशिदीचा विषय असेल तर तुम्ही मंदिर ट्रस्ट आणि मशीद समितीने केलेला करारा वाचावा. परंतु, हल्ली नवनवे वाद उकरून काढले जात आहेत.