Saturday, May 25, 2024

विरोधी पक्षाच्या उमेदवाराला भेटायला जाऊ नका, अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी…

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चांगलीच तंबी दिली. ‘विरोधी पक्षाच्या उमेदवाराला भेटायला जाऊ नका, अन्यथा मी ऐकूण घेणार नाही. महायुतीचा धर्म पाळा’, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

मावळ लोकसभा मतदारसंघात आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आपण अनेकांना ओळखतो. आपल्या विरोधातील उमेदवाराचे आणि आपले अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. मात्र, माझी सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की, १३ तारखेचे मतदान होईपर्यंत कोणालाही भेटायला जाऊ नका. दादा सहज गेलो होतो, गप्पा मारायला गेलो होतो, गप्पा नको आणि टप्पा नको. मैत्री नातं-गोतं भावकी-रावकी बाजूला ठेवा. महायुतीचा धर्म पाळा”, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles