गेल्या रविवारी अजित पवार यांनी मोठं राजकीय बंड करत शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांना ३० हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. बरोबर एक वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय सत्तानाट्य घडलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्षभरानंतर मोठं राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेला आहे. एकंदरच हे गरमागरमीचे वातावरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजची आठवण करून देत आहे.साधारण एक वर्षांपूर्वी प्लॅनेट मराठीवर ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील अभूतपूर्व सत्तानाट्य दाखवणाऱ्या या बेवसीरिजला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. यातील डायलॅाग्जही भरपूर गाजले. राजकारणातील सत्यस्थिती, डावपेच, सत्तापालट, रिसॅार्ट पॅालिटिक्स, नेत्यांची, आमदारांची पळवापळवी, पक्ष बदल या सगळ्या गोष्टी यात तंतोतंत पाहायला मिळाल्या.
नुकतंच वेबसीरिज मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते उपेंद्र लिमये यांनी एक व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओत उपेंद्र लिमयेंनी चाहत्यांसोबत वेबसीरिजमधील एक शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे