Meditationमेडिटेशन :-
बऱ्याचदा दुर्लक्षित केले जाते किंवा कमी महत्त्वाचे समजले जाते. तथापि मेडिटेशनचे खालील फायदे वाचल्यास आपणही न चुकता नियमित मेडिटेशन करायला सुरुवात कराल.
१) मेडिटेशन मुळे निव्वळ तणाव कमी होतो असे नाही तर तणावासाठीचा हार्मोन क्वार्टिसोल हा सुद्धा कमी झाल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.
२) अभ्यासात असे दिसून आले आहे की जे विद्यार्थी माईंड फुललेस मेडिटेशन जसे की विपश्यना करतात त्यांचे यशाचे प्रमाण अधिक असते.
३) मेडिटेशन मुळे मेंदूत असे बदल घडून येतात की जे मेंदूंच्या अनेक विकारांपासून संरक्षण घडवतात.
४) मेडिटेशन मुळे आपल्याला भावभावनांवर अधिक चांगल्या प्रकारे क्रिया प्रतिक्रिया करता येतात. भावभावना अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्याची क्षमता निर्माण होते.
५) मेडिटेशन मुळे एकटेपणाची अथवा एकाकीपणाची किंवा एकटे पडल्याची भावना कमी होत जाते. तसेच इन्फ्लामेशन कमी होत जाते.
६) मेडिटेशन मुळे स्मोकिंग, अल्कोहोल अथवा इतर मादक पदार्थांची आसक्ती कमी होत जाते.
७) चिंता भीती काळजी तीव्रता कमी होत जाते कारण त्यासाठी कारणीभूत असलेल्या विशिष्ट न्यूरल पाथवे ची क्षमता कमी करते.
८) मेडिटेशन करण्यामुळे अधिक क्रिएटिव्हिटी, नवनवीन संकल्पना निर्मिती क्षमता वाढते.
९) दररोज मेडिटेशन केल्यामुळे त्वरित गोष्टी आठवण्याची क्षमता ( रॅपिड मेमरी रिकॉल ) वाढते.
१०) दररोज नियमित मेडिटेशन केल्यामुळे एजिंग अर्थात म्हातारपण येण्याचा वेग मंदावतो.