चविष्ट खादयपदार्थ खाणे सोपे असते पण ते तयार करणे तितकेच अवघड असते. मेदूवडा तयार करणे देखील तसे थोडे अवघड आहे आहे विशेषत: नव्याने स्वयंपाक शिकाणाऱ्यांसाठी. मेदूवड्याचे पीठ तयार करणे तसे सोपे आहे पण, तेलात मेदूवडा टाकताना त्याला हवा जसा आकार देता येत नाही. काहीजण मेदू वडा तयार करण्यासाठी यंत्र वापरतात ज्यात पिठ टाकले जाते आणि तेलात वडा सोडला जातो. हे यंत्र वापरून परफेक्ट मेदू वडा तयार करता येतो. पण तुमच्याकडे असे कोणतेही यंत्र नसेल तर काळजी करू नका. चहाची गाळण वापरून तयार करा मेदू वडा
चहाची गाळण वापरून तुम्ही परफेक्ट मेदूवडा तयार करू शकता. ऐकायला विचित्र वाटेल पण ही ट्रिक एकदा वापरून पाहा.
चहाची गाळण घ्या आणि ती उलटी पकडा.
आता उलट्या गाळणीच्या जाळीवर तयार मेदूवड्याचे पीठ लावा.
पिठाच्या मधोमध एक छिद्र करा.
गाळण सरळ करून हलकेच वडा गरम गरम तेलात सोडा.
तुमचा परेफक्ट आकाराचा मेदू वडा तयार आहे.