जगभरात प्रसिद्ध असा दक्षिण भारतीय ब्रेकफास्ट कसा बनवायचा हे पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे अवघ्या १० मिनिटात न आंबवता, न सोडा घालता इतकंच अगदी तेलही न वापरता आपण हे मेदुवडे कसे बनवायचे शिकणार आहोत.
इन्स्टाग्रामवर @cooking_with_Tripti या चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यामध्ये दिसणारे मेदुवडे हे खरंतर इडलीप्रमाणे वाफवलेले आहेत. आपल्याला हवे असेल तर आपण हे पीठाचे वडे तळून किंवा अगदी शॅलोफ्राय करून सुद्धा खाऊ शकता.