Tuesday, April 23, 2024

पंतप्रधान मोदींनी भल्या पहाटे हत्तीवरून केली जंगल सफारी…video

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. काझीरंगा येथे रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर आज पहाटे ५ वाजता ते तेथील प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. यावेळी त्यांनी हत्तीवरून जंगल सफारीचा आनंद घेतला आणि जीप राइडमधून निसर्गसौंदर्यही न्याहाळले.
https://x.com/narendramodi/status/1766381410456051826?s=20

पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम उद्यानाच्या सेंट्रल कोहोरा रेंजमधील मिहिमुख भागात हत्तीवरून जंगल सफारी केली. त्यानंतर त्यांनी त्याच रेंजमध्ये जीप राइडचाही आनंद लुटला. इतकेच नाही, तर डोक्यावर कॅप अन् हातात कॅमेरा घेत, त्यांनी जंगलात फोटोग्राफीही केली. पंतप्रधानांसोबत काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका सोनाली घोष आणि इतर वरिष्ठ वनाधिकारीही होते. डोक्यावर काळी टोपी, प्रिंटेड पँड, टी-शर्ट आणि ऑफ व्हाईट शूज यासह एका काळे स्लीव्हलेस जॅकेट, डोळ्यावर गॅगल अन् हातात कॅमेरा अशा लूकमध्ये मोदी दिसत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles