मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये चालत्या मेट्रोमध्ये चोरटा तरुणाचा फोन हिसकावून पळताना दिसत आहे. हायरल व्हिडीओ चालत्या मेट्रोतील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मेट्रोच्या दरवाज्याजवळ उभा असलेला तरुण हातात असलेल्या मोबाईलमध्ये काहीतरी बघताना दिसत आहे. तितक्यात एक तरुण तिथे येतो आणि त्याला काहीतरी विचारतो. त्यावर तो काहीतरी सांगतो. पुढे स्टॉप येतो आणि मेट्रोचा दरवाजा उघडतो. मेट्रोचा दरवाजा जसा बंद होणार तितक्यात तो तरुण मोबाईल बघणाऱ्या तरुणाच्या हातचा मोबाईल हिसकावतो आणि बाहेर पळतो. या तरुणाला त्या क्षणाला काहीही सुचत नाही. जेव्हा त्याला कळते की समोरच्या तरुण त्याचा फोन हिसकावून पळाला आहे तोपर्यंत मात्र दरवाजा बंद झालेला असतो आणि तो काहीही करू शकत नाही.
चालत्या मेट्रोत चोराची अशी हातसफाई…मोबाईल गेलेला तरूण पाहतच राहिला…व्हिडिओ
- Advertisement -