Home क्राईम न्यूज किरकोळ कारणावरून युवकाचा केला खून गुन्हा दाखल नगर शहरातील घटना

किरकोळ कारणावरून युवकाचा केला खून गुन्हा दाखल नगर शहरातील घटना

0
2425
Ahmednagar Crime News

अहमदनगर प्रतिनिधी – एमआयडीसी भागातील सह्याद्री चौक परिसरामध्ये मंगळवारी एका वडापावच्या दुकानावर शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून एका युवकाचा खून करण्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास या प्रकरणातील मयत प्रवीण कांबळे हा एका वडापाव च्या दुकानावर वडा खाण्यासाठी गेला होता मात्र दुकानदाराने त्याला वडापाव 20 रुपये ला असल्याचे सांगितल्यानंतर पाच रुपये कमी करा या गोष्टीवरून दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली आणि या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले.वडापाव दुकानदाराच्या मदतीला आसपास असलेल्या काही लोकांनी मदत करून प्रवीण कांबळे याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर प्रवीण यास गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र बुधवारी सकाळी प्रवीण कांबळे हा मयत झाला आहे.
प्रवीण कांबळे याच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून अजून काही आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.तर या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यात यावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा होण्याकरता पोलीस प्रशासनाने योग्य तो तपास करावा अशी मागणी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे व सुमेध गायकवाड यांनी केली.