Sunday, July 21, 2024

विधानपरिषद निवडणुकीत मिलिंद नार्वेकर निवडून येतील, भाजप नेत्यानेच व्यक्त केला विश्वास

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अवघ्या एका दिवासाचा कालावधी राहिला आहे. महायुती की महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत होणार याची चर्चा सुरू असताना भाजप नेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटातील मिलिंद नार्वेकर विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

प्रवीण दरेकर म्हणाले, ‘उद्याच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांचा पराभव उद्धव ठाकरे होऊ देणार नाहीत. कारण उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी (शरद पवार गट) पेक्षा उद्धव ठाकरे यांना झुकते माप देईल’, असा दावा दरेकर यांनी केला आहे.विधान परिषदेच्या निवडणुकीत शंभर टक्के महाविकास आघाडीचा गेम होणार असल्याचे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles