राज्यात सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रति लिटर 5 रूपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.
मात्र, घोषणेवर किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी टीका केलीय. राज्यातील 72 टक्के दूध खासगी संस्थांना दिले जाते आणि सरकारनं दिलेलं अनुदान फक्त सहकाराला आहे.त्यामुळं बहुतांश दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यामुळं सरकारनं सर्वांना अनुदान द्यावं, अशी मागणी किसान सभेनं केली आहे.
महाराष्ट्रातील 72 टक्के दूध हे खासगी संस्थांना घातलं जातं. त्यामुळं 72 टक्के शेतकरी सरकारनं घेतलेल्या दूध अनुदानाच्या निर्णयापासून वंचित राहणार असल्याचे अजित नवले म्हणालेत. हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. सरकारनं भेदभाव करु नये. सरकारनं खासगी आणि सहकारी दूध संस्थांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान द्यावे अश मागणी अजित नवलेंनी केली आहे.