वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांच्या अटकेसाठी मुस्लिम समाजाने संपूर्ण राज्यात आंदोलने आणि निषेध मोर्चे काढण्यात आले होते.मात्र सरकारकडून रामगिरी महाराज यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने 23 सप्टेंबर रोजी संभाजीनगरातून हजारो वाहने मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याची माहिती एम आय एमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. तसेच उद्याची रॅली ही राज्यातील सर्वात मोठी रॅली असणार आहे ज्याची नोंद देशाकडून घेतली जाईल असा दावा देखील जलील यांनी केला आहे.
आम्ही उद्या शांततेच्या मार्गाने मुंबईकडे जाणार आहे मात्र सरकारकडून यात खोडा घातला घातला जात आहे त्यामुळे आम्ही गंगापूर-वैजापूर मार्गे न जाता समृद्धी महामार्गावरून मुंबईला जाणार आहोत असेही यावेळी इम्तियाज जलील म्हणाले. पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, आमच्या या रॅलीला गालबोट लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मात्र आम्ही सरकारच्या कोणत्याही षडयंत्राला बळी पडणार नाही आणि या रॅलीमध्ये काहीही चुकीचे करणार नाही असं देखील जलील म्हणाले.