राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी अनुपस्थित होते.यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सायंकाळी केंद्रातील भाजप नेत्यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले.
यावरून छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, “दादांना थ्रोट इन्फेक्शन असल्यामुळे ते दिल्लीला जाऊ शकत नाहीत. बैठक अगोदर ठरली होती म्हणून आम्ही जातोय. आज कॅबिनेट होती, त्यांनी निरोप दिला की आज मी येणार नाहीय तुम्ही मिटिंग चालवा. जर दादा थ्रोट इन्फेक्शनमुळे देवगिरीतून मंत्रालयात जाऊन शकत नाही. तर दिल्लीला कसे जातील?
दादांना राजकीय आजारपण आलं आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच छगन भुजबळ म्हणाले की, “दादांना राजकीय आजारपण कधीच येणार नाही. काळजी करू नका. “