Sunday, December 8, 2024

मंत्री छगन भुजबळ संतापले, म्हणाले…रोहित पवारला सांगा…

मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावर टीका करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घ्या, त्यांना इतिहास ठाऊक नाही असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. रोहित पवारला सांगा, मी जानेवारी, फेब्रुवारी १९८५ मध्ये आमदार झालो. एप्रिल १९८५ ला मुंबईचा मुंबईचा महापौर झालो. त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मोठं केलं असल्या फालतू गोष्टी करु नका. इतिहास जाणून घ्या. छगन भुजबळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून शरद पवारांकडे आला नव्हता. मी शिवसेनेचा नेता होतो आणि आमदार होतो. आज किती दिवस हे चाललं आहे. अजित पवार तुम्हाला भेटत आहेत. अजित पवार आणि तुमचं पवार घराणं ठरवून शरद पवारांचा राजीनामा द्यायचा हे करता. तेव्हा आम्हाला सांगितलं होतं का? जास्त मी त्याला किंमत देत नाही. ते जेवढं पुढे येतील तेवढा मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देईन.” असं म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles