Sunday, December 8, 2024

मनोज जरांगेंच्या ‘बालेकिल्ल्या’त भुजबळांची तोफ धडाडणार,आरक्षण बचाव एल्गार

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर ज्या जालन्यात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं होतं, त्याच जालन्यात उद्या (17 नोव्हेंबर) ओबीसी नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे याच सभेत मंत्री छगन भुजबळ यांची तोफ देखील धडाडणार आहे. त्यामुळे, आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होतं. आता त्याच आंतरवाली सराटीपासून काही अंतरावर असलेल्या धाईत नगर येथील पाचोड रोडवर आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या या सभेत मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित असणार आहे. तर, ‘जो ओबीसी हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ अशी टॅगलाईन या सेभासाठी देण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles