मंत्री दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना भाष्य केले. महाराष्ट्रात निघालेले फतवे व उशीरा जाहीर झालेल्या जागांमुळे आम्हाला नुकसान झाल्याची कबुली दीपक केसरकर यांनी दिली. मात्र, आम्ही आता विधानसभेला जास्त काळजी घेऊ. आम्हाला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक सनसनाटी दावा केला. उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये यायचं आहे. त्यासाठी ते विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी मेसेज पाठवत आहेत, असे केसरकर यांनी सांगितले.