राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. “उद्धव ठाकरे यांच्याकडे मी 1 कोटींची चेक दिला होता”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. “मंत्रिपदासाठी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे माहिती नाही”, असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “मी 1 कोटी रुपयांचा चेक दिला होता. पण मंत्रिपदाच्या आगाऊ दिले नव्हते. त्यामुळे पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रीपद?”, असा सवाल दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी दीपक केसरकर यांच्याकडे मंत्रिपदासाठी तब्बल 1 कोटी रुपये घेतले होते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. दुसरीकडे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर यांचे आरोप फेटाळले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्याकडे मी 1 कोटींचा चेक दिला होता… मंत्री केसरकर यांचा गौप्यस्फोट
- Advertisement -