पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बैठक घेतली असून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहे. त्यांना काही दिवसांची मुदत दिली असून ज्या महसूल मंडळात सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला आणि ज्या महसूल मंडळात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, अशा अधिसूचित केलेल्या मंडळांच्या क्षेत्रातील शेतकर्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचा विचार सुरू असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. ते नगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.