परळीचे आमदार,राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे कृषीमंत्री झाले आहेत. नवनिर्वाचित कृषीमंत्री मुंडेंचा आज (15 जुलै) वाढदिवस आहे.
वाढदिवसाचे सेलिब्रेशन करु नका, असे आवाहन मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. याबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. शेतकरी तसेच कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याच्या सूचना या पत्रकात दिल्या आहेत. मुंडेंच्या वाढदिवसाची जोरदार तयारी त्यांच्या समर्थकांनी केली आहे, पण मुंडेंनी आपल्या वाढदिवसानिमित्त टि्वट करीत सूचना केल्या, यामुळे उत्साही कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
शेतकरी चिंतेत आणि संकटात असताना मी वाढदिवस साजरा करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळं मी सार्वजनिक रित्या साजरा करणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी टि्वट करीत स्पष्ट केलं आहे.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. आपला बळीराजा संकटाच्या छायेत असताना मी वाढदिवस साजरा करणे संयुक्तिक नाही.
तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा माझ्यासोबत कायमच आहेत. परंतू पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवत… pic.twitter.com/8eJ8O7NYVZ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 14, 2023