Tuesday, February 18, 2025

मला शिर्डीतून उमेदवारी देण्यास फडणवीस तयार होते पण एकनाथ शिंदेंमुळे…

“मला शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मी शिर्डीतून लढलो होतो. त्यावेळी माझा पराभव झाला होता. या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस मला शिर्डीतून उमेदवारी द्यायला तयार होते. इतकंच नाही तर फडणवीस यांनी मला शिर्डीची जागा मिळावी म्हणून प्रयत्न केले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचण असल्याने मला उमेदवारी मिळाली नाही.” असा गौप्यस्फोट रामदास आठवलेंनी केला आहे. रामदास आठवले म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आरपीआयला किमान एक जागा मिळावी असा आमचा आग्रह होता. पण तसं घडलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिलं आहे की २०२६ चा माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर रिपाईबद्दल विचार केला जाईल. केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद रिपाईला मिळावं यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करणार आहेत. तसंच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हाही रिपाईला पद दिलं जाईल. महामंडळाची दोन चेअरमन पदं आणि जिल्हा कमिटीमध्ये रिपाईला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचंही रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles