Wednesday, April 17, 2024

सुपा एमआयडीसीमध्ये खंडणीबहाद्दर आणि गुंडांचे स्थान….विखेंचा लंकेंवर हल्लाबोल…

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालीयं. उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंनी मोहटादेवी गडावर आयोजित स्वाभिमानी जनसंवाद यात्रेतून विखे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली होती. लंके यांच्या टीकेवर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विखे म्हणाले, टिका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेच्या न्यायलायात जावून आपण मत मागतो आणि डॉ सुजय विखे नक्कीच निवडून येतील असा विश्वास विेखे पाटलांनी व्यक्त केलायं. तसेच निलेश लंके जो पर्यंत मित्रपक्षात सहकारी होते तो पर्यंत त्यांना मोदीृ, शहा आणि राजनाथ सिंग यांच्या जिल्हा दौ-याबद्दल आक्षेप नव्हता. आता ते विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचं विेखे पाटलांनी म्हटलंय.

निलेश लंके हे विनोद करु शकतात, याचं आश्चर्य वाटतं असल्याच म्हणत सुपा एमआयडीसीमध्ये खंडणीबहाद्दर आणि गुंडांचे स्थान असल्याचं बोलत निलेश लंकेंवर विखेंनी जोरदार निशाना साधला आहे. शिर्डी आणि नगरमध्ये एमआयडीसी उभारली माजी महसूलमंत्र्यांना शेती महामंडळाच्या जमीनी देण्याचं का सूचलं नाही? असा सवालही उपस्थित करत नाव न घेता बाळासाहेब थोरातांवरही राधाकृष्ण विखे यांनी जोरदार टीका केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles