महसूल मंत्री राधाकृष्ण विखे विखे पाटील यांनी सोमवारी श्रीक्षेत्र निजर्णेश्वर (संगमनेर) येथे बोलताना राजेंद्र विखे यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला पाठिंबाच असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की पदवीधर निवडणुकीतच राजेंद्र विखे यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु त्या वेळेस पक्षीय स्तरावर काही वेगळे निर्णय झाले. त्याला साथ देण्याची भूमिका घेतली. आताच्या निवडणुकीसाठी राजेंद्र विखे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली आहे. त्यांच्या उमेदवारीला माझा पाठिंबाच आहे.
राजेंद्र विखेंच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा… मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
- Advertisement -