Friday, December 1, 2023

संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल… विखे पाटील यांची टीका…

संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसाची फसवणूक करुन कोट्यवधींची माया गोळा केली. कोव्हिडच्या काळात एका बाजूला लोक मृत्यूशी झुंजत होते, मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यात ज्याने धन्यता मानली तो संजय राऊत आहे अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

संगमनेरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.संजय राऊत यांनी विखे पाटील यांच्यावर साखर कारखाना प्रकरणात आरोप केले. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे त्याने आयुष्यभर दलालीच केली आहे त्याच्या टीकेला कुठे महत्व देता? असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: