अहमदनगर -जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची व तिला गर्भवती करून मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अल्पवयीन मातेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे (वय ३६, रा. तळेगाव दिघे) याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ज्ञानेश्वर बोडखेने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. यामुळे ती गर्भवती राहिली आणि प्रसूतीसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. अल्पवयीन मातेने या संदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार, ज्ञानेश्वर बोडखे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते यांनी आरोपीला संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर उभे केले असता जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी आरोपीस २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले दरम्यान, आरोपीवर शेतमजुरी करणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.