नगर -बोल्हेगाव गांधीनगर परिसरात एक खोलीमध्ये नेवून किशोरवयीन तरूणीवर एकाने अत्याचार केला. फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोवताली पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.चेतन संतोष सरोदे (रा. नगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी अभ्यासविषयक झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडली होती. तोच आरोपीने तिचा पाठलाग केला. तिला दुचाकी बसण्याची जबरदस्ती केली.
तिने नकार दिला असता आरोपीने शिवीगाळ करून तिला दुचाकीवर बसविले. बोल्हेगाव गांधीनगर पसिरात नेवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणला काही सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची भिती दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.