Sunday, September 15, 2024

पारनेर तालुक्यात सुजित झावरे पाटलांच्या संकल्पनेतून राबावला मियावाकी अटल घनवन प्रकल्प; काय आहे हा प्रकल्प ? पहा व्हिडिओ

सुजित झावरे पाटील यांच्या संकल्पनेतुन साकारलेला मियावाकी अटल घनवन उपक्रम

सदर घनवन योजनेसाठी सुजित झावरे पाटील यांनी सन २०२२ मध्ये गावांतील जेष्ठ नागरिकांची सदर वनराई करण्यासाठी चर्चा करुन जागा निवडण्यात आली. सदर योजनेचा फायदा आपल्या सर्वांना कसा होईल हे पटवून सांगितले व यासाठी मांडओहोळ याठिकाणी वासुंदे हद्दीतील जागेची निवड करुन जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अटल घनवन योजने मार्फत वनराई साठी निधी उपलब्ध करुन सन २०२३ मध्ये अटल घनवन योजनेची सुरुवात करुन वृक्षाची लागवड करण्यात आली. आज सदर घनवन मध्ये ४५ ते ५० पेक्षा जास्त प्रजाती वृक्षाची लागवड करुन अत्यंत घनदाट अशी वनराई सुजित झावरे पाटील यांचे संकल्पेतुन करण्यात आली. सदर वनराई पाहण्यासाठी वनअधिकारी यांनी पाहणी करुन अत्यंत चांगल्या प्रकारे घनवन योजना केल्याने जिल्हयातील, तालुक्यातील नागरिकांना पाहण्यासाठी नागरिक येत असतात.

मियावाकी घनवन पध्दत

मियावाकी पध्दत हि एक वनीकरण तंत्र आहे, जे स्थानिक जातीचा वापर घनदाट, बहुस्तरीय जंगले तयार करण्यासाठी करते, हि वने तयार करण्याचा मुख्य तत्व म्हणजे वृक्षारोपन करण्यासाठी देशी प्रजातीचा वापर मियावाकी पध्दतीमध्ये कमीतकमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली जाते. यामध्ये वृक्षांची वाढ झपाटाने होते. मियावाकी पध्दत ही ओसाड जमिनीची निवड करुन तेथील मुळ निकृष्ट दर्जाची माती खोदुन काढुन तेथे शेणखत, सेंद्रिय खते आणि गहू /भात यांचा कोंडासमप्रमाणात मिसळून त्यावर खड्डे करुन आपणास हवी तशी वृक्ष लागवड करता येते. खतांमुळे वृक्षांना भरपूर मुलद्रव्ये मिळतात आणि भाताचे तूस वापरल्यामुळे पाण्याचा निचरा होतो, हवा खेळती रहाते, उपयोगी सुक्ष्मजीव झपाटयाने वाढतात व मोठ्या प्रमाणावर हयुमस तयार होतो. या पध्दतीमध्ये एका जागेवर कमीत कमी ५० ते १०० प्रकारची देशी वृक्ष लावण्यात येतात. पारंपारिक पध्दतीने जंगल तयार करण्यास २०० वर्ष सुध्दा लागु शकत परंतु मियावाकी पध्दतीने जेमतेम २० वर्षात आपण घनदाट जंगलाची निर्मिती करु शकतो, जंगल निमित्ती फक्त लाकडासाठी असू नये, त्याचा उपयोग जैवविविधता समृध्द करणे, वनस्पतींचा औषधी गुणधर्माचा मानवी कल्याणासाठी फायदा घेणे आणि कमीतकमी जागेत जास्तीत जास्त हरित क्षेत्र वाढवणे हा हेतु आहे.


यावेळी वनअधिकारी वैशाली भलावी , वनपाल गिरी साहेब, किशोर कड, शंकर बर्वे, किसन धुमाळ, लहानभाऊ झावरे, दिलिप पाटोळे, बाळासाहेब झावरे, खंडू टोपले, गणेश झावरे, शंकर झावरे, दत्तात्रय जगदाळे, पत्रकार गणेश जगदाळे मान्यवर मंडळी उपस्थितीत होते. यावेळी सुजित झावरे पाटील यांच्या कडून वन मजुरांना टोपी वाटप करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles