आता राज्यातील नवी आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना () सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने या योजनेचा वार्षिक प्रीमियम ६० टक्क्यांनी वाढवून तो ३००० कोटी रुपयांहून अधिक केला आहे. नवी योजना १ जुलैपासून लागू होणार आहे.नव्या आरोग्य विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना आता दीड लाखांऐवजी पाच लाख रुपयांचा विमा कव्हर मिळेल. नवी योजना लागू होण्याआधी विमाधारकांना याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आणि एक लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र द्यावं लागत होतं. मात्र आता सरकारने हे कागदपत्र जमा करणं गरजेचं नसून सर्व नागरिकांसाठी समान योजना लागू करण्याचं सांगितलं आहे. आता उत्पन्नांचीही कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. या योजनेंतर्गत १००० रुग्णालयं होती मात्रा आता वाढवून ती १९०० करण्यात आली आहेत.