Monday, July 22, 2024

अजित पवारांच्या आमदारांनी सांगितली ‘आप बीती’ म्हणाले.. मी फसलो पण तुम्ही…

आमदारांनाही सायबर चोरटे गंडा घालतात. आमदारांना गंडा घालणारी एक टोळीच सक्रिय आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनाही सायबर चोरट्यांनी गंडा घातला होता. या प्रसंगाचा किस्सा खुद्द भरणे यांनी पोलिसांबरोबर झालेल्या एका बैठकीत सविस्तर सांगितला आहे. तसेच इतरांनी खबरदारी घ्यावी, असाही सल्ला भरणे यांनी दिला आहे.
फोनवरून आपल्याला १५ हजारांचा गंडा घातल्याची माहिती आमदार भरणे यांनी एका बैठकीत दिली. ते म्हणाले, मला एकेदिवशी फोन आला. समोरील व्यक्तीने सांगितले की, मामा आमच्या गाडीचा इंदापूर रोडवर अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला असून इतर लोक रुग्णालयात आहेत. आम्हाला औषधोपचारासाठी ताबडतोब १५ हजारांची गरज आहे. मतदारसंघातील लोक असावेत, असे वाटल्यामुळे मी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. कोणत्या रुग्णालयात दाखल असून किती गंभीर मार लागला याचीही विचारपूस केली.
आमदार भरणे पुढे म्हणाले की, फोनवर बोलणाऱ्यांनी मला भावनिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि ताबडतोब पैसे पाठवा अशी विनंती केली. मी रुग्णालयात माणसाकरवी पैसे पाठवतो, असे सांगितल्यावर त्यांनी नातेवाईकांबरोबर बाहेर आलोय, असे सांगण्याचा बनाव केला. आमच्या रुग्णवाहिनीला डिझेल भरायला पैसे नाहीत, असेही त्यांनी सांगितले. मग मला एक नंबर देऊन मोबाइलवर पैसे पाठविण्याची विनंती केली. मीही कार्यकर्त्याच्या मोबाइलमधून त्यांना १५ हजार पाठवून दिले.

पैसे पाठवून दिल्यानंतर मी काही वेळाने इंदापूरला अपघात झाला का? याची चौकशी केली. पण तालुक्यात अपघातच झाला नसल्याची मला माहिती मिळाली. तेव्हाच आपण गंडलो गेलो आहोत, याची मला कल्पना आली, असे आमदार भरणे मामा म्हणाले. फक्त मलाच नाही तर इतर आमदारांनाही अशाचप्रकारे फसविण्याचा प्रयत्न झाल्याचेही ते म्हणाले. मुंबईत मला आणखी एका आमदाराने सांगितले की, मोबाइलवर पैसे मागण्यासाठी काही लोकांनी फोन केला होता. पण मी पैसे काही पाठविले नाहीत. त्या आमदाराने सांगितले की, पालघर जिल्ह्यात सदर टोळी सक्रीय आहे. आमदारांना फोन करून भावनिक करत पैसे उकळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याची माहिती भरणे यांनी दिली.चोरटे आता पुढे गेले आहेत. मोबाइलवर दुरूनही चोरी करता येते. त्यामुळे पोलिसांनी अशावेळी अधिक जागृत राहण्याची आवश्यकता आहे. नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षा कशी पुरविता येईल, याचा प्रयत्न करावा, असे निर्देश दत्तात्रय भरणे यांनी पोलिसांना दिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles