Thursday, July 25, 2024

भाजप आमदाराने स्पष्टच सांगितले… शिंदे प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच…

ठाण्यात निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी महायुतीची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. यावेळी भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. पण आमच्या दृष्टीकोनातून देवेंद्र फडणवीस हेच आमचे लीडर आहेत. मी तर ओपन बोलतो, म्हणजे प्रोटोकॉल म्हणून एकनाथ शिंदे राज्याचे प्रमुख आहेत. मात्र, पक्षाच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस. त्यांच्या अनुषंगानेच भारतीय जनता पक्षाचा कारभार चालतो, तसेच तो भविष्यातही चालणार आहे”, असं भाष्य भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी यावेळी केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles