Sunday, July 21, 2024

शेवगांव तालुक्यात शेअर मार्केट ट्रेडींग मध्ये नागरीकांची फसवणूक, आ.राजळे यांनी केली सखोल चौकशीची मागणी

शेवगांव तालुक्यातील शेअर मार्केट ट्रेडींग मध्ये नागरीकांच्या झालेल्या फसवणूकीची सखोल चौकशी करुन कारवाई करा – आ. मोनिका राजळे

शेवगांव प्रतिनिधी –
शेवगांव तालुक्यातील शेअर मार्केट ट्रेडींग मध्ये नागरीकांच्या झालेल्या फसवणूकीची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार मोनिकाताई राजळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात आमदार मोनिकाताई राजळे यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले की, शेवगांव तालुक्यात मागील गेल्या एक ते दिड वर्षापासून शहरी व ग्रामीण भागातही बोगस शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्‍या मार्फत शेअर मार्केट ट्रेडींग मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना मोठया प्रमाणात व्याज परतावा देण्याचे आमिष दाखविले गेले. बँका, पतसंस्था यापेक्षा जास्त किंवा भरमसाठ परतावा मिळेल या आश्वासनांना बळी पडून हजारो नागरीकांनी या शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्‍यांकडे कोटयावधी रुपयांची गुंतवणुक केली आहे. शेवगांव तालुक्यात अशा 10, 12 बोगस शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्‍या या परिसरात आपल्या एजंट मार्फत लोकांना गुंतवणुक करावयास लावत होत्या, या शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्‍यात हजारो लोकांनी कोटयावधी रुपये गुंतवणूक केली आहे.
सद्यस्थीतीत या ट्रेडींग कंपन्‍या व एजंट कंपन्‍यांना टाळे लावून, शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्‍यांचे चालक व एजंट फरार झाले आहेत. त्यामुळे हजारो नागरीक, व्यावसायीक, गुंतवणूक दारामध्ये आर्थिक फसवणूक होत असे कळल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलने, मोर्चा, निवेदने देवून पोलीस स्टेशनला या शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्‍या व एजंटवर गुन्हे दाखल झाले आहेत. व या गुन्हयांचा तपास होवून गुन्हेगारांना पकडून गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळावेत ही अपेक्षा आहे.
शेवगांव तालुका व परिसरातील हजारो गोरगरीब, लहान व्यावसायीक, महीला, यांनी आपल्या जवळची जमा पुंजी यामध्ये गुंतविली आहे. कुणी शेती गहाण ठेवून, कुणी दागिने गहाण ठेवून, कुणी बचत गटातून पैसे उचलून, कुणी आपली गाय, बैल, शेळया जनावरे विकून पैसे ऊभे केले व या शेअर मार्केट ट्रेडींग मध्ये गुंतविले आहेत. हजारो गोरगरीब, सर्व सामान्य, महीला व मजूर, यांची या बोगस शेअर मार्केट ट्रेडींग कडून फसवणूक झाली आहे.
या सर्वसामान्य नागरीक, गोरगरीब, महीला, माता भगिनी, मजूर यांना न्‍याय मिळवून देण्यासाठी या परिसरातील शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्‍या चालक, एजंट, यांचेवर गुन्हे दाखल होवून, तात्काळ योग्य तपास करून या आरोपींच्या मालमत्ता जप्त होवून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक, कार्यालयाने पुढाकार घेवून योग्य तपास करून न्‍याय मिळवून द्यावा. या शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्‍या व एजंट विरोधात योग्य कारवाई न झाल्यास, मला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत या विरुध्द आवाज उठवावा लागेल असे आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या.
या संदर्भात आज आमदार मोनिका राजळे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक मा. राकेश ओला साहेब यांना समक्ष् भेटून निवेदन दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, पाथर्डी मार्केट कमिटीचे सभापती सुभाष बर्डे व जमीर आतार यावेळी उपस्थीत होते.

Related Articles

1 COMMENT

  1. ज्यांना बरोबर घेऊन निवेदन देतात ते किती टक्क्यांनी सवकरकी करतात ते पण पहा एकदा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles