निलेंश लंकेंनी यावेळी स्वतः बसचे स्टेअरिंग हातात घेतले अन् दादा धास्तावल्याचे पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पारनेर मतदारसंघात दादांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते मोहटादेवी येथे जाणाऱ्या बसेसचा शुभारंभ झाला. विशेष म्हणजे निलेंश लंकेंनी यावेळी स्वतः बसचे स्टेअरिंग हातात घेतले अन् दादा धास्तावल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पारनेरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार निलेश लंके यांच्या घरीही उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली. तसेच दादांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभही झाला. अजित पवार यांच्या हस्ते मोहटादेवी येथे जाणाऱ्या बसेसचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार निलेश लंकेंनी स्वतः दादांचे स्वारथ्य केले. मात्र यावेळी लंकेंच्या हातात स्टेअगिंर पाहून दादा धास्तावल्याचे पाहायला मिळाले. दादांनी निलेश लंकेना सावकाश सावकाश रे म्हणत, बस हळू चालवण्याची सुचनाही केली.
यावेळी झालेल्या सभेत बोलताना अजित पवार यांनी आमदार निलेश लंकेंच्या कामाचे कौतुक केले. तसेच “आम्ही सत्तेला हपापलेलो नाही सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नाही,” असेही अजित पवार यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी हा टोला नेमका कोणाला लगावला? याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे