ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या ग्रामपंचायत पारनेर तालुक्यातील 7 ग्रामपंचायत पैकी निवडणुकीत निलेश लंके गट अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यात 6 ग्रामपंचायत गेल्या आहेत. अजित पवार गटाचा दबदबा जिल्ह्यात देखील दिसून आले आहे. तालुक्यातील 45 ग्रामपंचायतवर अजित पवार गटाचा विजय झाला आहे.
याबाबत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी या विजयाचे श्रेय अजित पवार आणि मतदारांना दिले आहे. अजित पवारांनी विकास निधीच्या माध्यमातून मतदारसंघाला केलेल्या मदतीमुळेच लोकांनी आमच्या बाजूने कौल दिल्याचे निलेश लंके यांनी म्हंटले आहे