आमदार निलेश लंके यांनी पारनेर मतदार संघातील मौजे बाभूळवाडे या गावची लोकसंख्या ३१५० असून त्यामध्ये ५२५ लोकसंख्या आदिवासी समाजाचे असून बाभूळवाडे गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सुमारे १२ कि.मी अंतरावर आहे. त्यामुळे गावातील आदिवासी बांधवांना व इतर सर्व सामान्य नागरिकांना उपचार मिळण्यात
अडचणीचे होत असल्यामुळे मौजे बाभूळवाडे येथे आदिवासी बांधवांची संख्या मोठया प्रमाणात असल्याने विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा या संदर्भात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांना निवेदन दिले.
निवेदनातील सर्व मुद्दे हे वस्तूनिष्ठ आणि अत्यंत महत्त्वाचे असून यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री सावंत यांच्याकडे केली. यावेळी यावर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती आ.लंके यांनी दिली.