Wednesday, November 13, 2024

ब्राह्मण समाज महासंघाच्या वतीने आ. संग्राम जगताप नगर भूषण पुरस्काराने सन्मानित

नगर : शहरांमध्ये विकासाचे चांगले काम उभे केले असल्यामुळेच नगरकरांचा विश्वास संपादन केला आहे त्या माध्यमातून एकमेकांशी ऋणानुबंध निर्माण झाले असल्यामुळे सर्व जाती धर्मातील लोक बरोबर आले, सकल ब्राह्मण समाज महासंघाने मी केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवून मला नगरभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे यामुळे माझी जबाबदारी वाढली असून अजून जोमाने शहर विकासासाठी काम करेल, पुरस्काराच्या माध्यमातून चांगल्या कामाची प्रेरणा व ऊर्जा मिळत असते, सकरात्मक दृष्टिकोन ठेवून आपण सर्वजण मिळून विकसित शहर निर्माण करू, ब्राह्मण समाजाला महापालिकेच्या माध्यमातून भगवान श्री परशुराम यांचे भव्य मंदिर उभा करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिले आहे, धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जात असतो, चांगल्या विचाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे लागते, शहरामध्ये चांगले वातावरण असून सर्वजण गुण्या गोविंदाने एकत्र राहून काम करत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
महायुती सरकारच्या वतीने भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबद्दल सकल ब्राह्मण समाज महासंघाच्या वतीने सन्मान सोहळ्या आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांना नगर भूषण पुरस्काराने सन्मानित करताना श्री समर्थ भक्त मंदार बुवा रामदासी, सुशील कुलकर्णी, दीपक रणनवरे, समाज रत्न पुरस्कार सन्मानार्थ विश्वजीत देशपांडे, ईश्वर दीक्षित, अशोक वाघ, विजया अवस्थी, बाजीराव धर्माधिकारी, मकरंद कुलकर्णी, शामराव कुलकर्णी, संजीवनी पांडे, बलवंत नाईक, धनंजय कुलकर्णी, श्रीकांत जोशी, रत्नाकर देशमुख, विजया कुलकर्णी, राजेंद्र पोद्दार, सकल ब्राह्मण समाज महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पोतदार,सुनील रामदासी, कालिंदी केसकर, दत्तोपंत पाठक गुरू, एन, डी कुलकर्णी, अनिल मुरकुटे, केतन क्षीरसागर, बाळासाहेब पवार, शिवाजी चव्हाण, माणिकराव विधाते, विजय देशपांडे, प्रमोद कुलकर्णी, योगेश दाणी, किरण वैकर, मोरेश्वर मुळे, नंदकुमार पोळ, प्रभाताई भोंग, श्रीगोपल जोशी , राम पारीख, नरेंद्र क्षोत्री, प्रशांत भालेराव, नचिकेत रसाळ, प्रिया जानवे, निसल गुरू,श्रिया देशमुख, सार्थक भोंग् आदी उपस्थित होते.


देशाच्या जडणघडणीमध्ये ब्राह्मण समाजाचे मोठे योगदान असून ते धार्मिकतेचा वारसा अखंडितपणे पुढे चालू ठेवण्याचे काम ते करत आहे आमदार संग्राम जगताप यांना मिळालेला धार्मिकतेचा वारसा पुढे घेऊन जात विकासाच्या योजना यशस्वीपणे ते राबवत असल्यामुळे त्यांना दिलेला नगर भूषण पुरस्काराचा मान योग्य आहे त्यांच्यामध्ये असलेला नम्रपणा आम्हाला नेहमीच भावत असतो त्यांच्याकडे असलेली विकासाची दूरदृष्टी मुळे शहरांमध्ये बदल झाल्यासारखा वाटत आहे असे मत मंदार बुवा रामदासी यांनी व्यक्त केले.

ब्राह्मण समाजाने नेहमीच सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन काम केले आहे, समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित होते ते सोडविण्यासाठी सकल ब्राह्मण समाज महासंघाच्या वतीने पाठपुरावा सुरू केला, आमदार संग्राम जगताप यांच्याकडे जागेची मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने सावेडी उपनगरामध्ये समाजाला जागा उपलब्ध करून दिले आहे, या ठिकाणी भगवान श्री परशुराम यांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे या जागेला संरक्षण भिंत बांधून देण्याचे काम देखील आमदार संग्राम जगताप हे करणार आहे, समाजाचे प्रलंबित विविध प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला असे मत सकल ब्राह्मण समाज महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पोद्दार यांनी व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles