हाविकास आघाडीचे सरकारच्या काळात मंजूर कामांसाठी मोठे प्रयत्न करून कोट्यवधी रूपयांचे काम राहुरी या आपल्या मतदार संघात सुरू झाले. परंतु, या कामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी नगरचे पुढारी धावपळ करू लागले आहे, असा टोला आ. प्राजक्त तनपुरे यांनी नावं न घेता माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना लगावला. राहुरी तालुक्यातील विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार सुजय विखे हे सध्या नगर दक्षिण मतदार संघात साखर वाटप करत आहे. यावरून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विखे यांच्यासह शिवाजी कर्डिलेंवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर नाही, त्याकडे अधिक लक्ष देण्याऐवजी साखर वाटप करून लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. लोणीच्या पुढार्यांचे एक वेळेचे ठीक पण नगरच्या पुढाऱ्याचे साखर वाटपात काय काम असा टोला तनपुरेंनी लगावला. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून खुशाल हत्तीवरून साखर वाटावी असा चिमटा देखील तनपुरे यांनी काढला.
आ.प्राजक्त तनपुरे म्हणाले, ‘त्यांनी’ खुशाल हत्तीवरून साखर वाटप करावे…
- Advertisement -