Saturday, April 26, 2025

आ.प्राजक्त तनपुरे यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी मंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने 13 कोटी 37 लाख रूपयांच्या मनी लाँड्रिंगचा ठपका ठेवला आहे. साखर कारखान्याच्या संदर्भात संदर्भात व्यवहार करताना हा घोटाळा झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे. आता या संदर्भात मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एन. रोकडे यांनी प्राजक्त तनपुरे आणि अन्य आमदारांना 12 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री दरम्यान कोट्यवधी रूपयांचा घोटाळा झाला. तसेच यामध्ये मनी लाँड्रिंगही झालं असे ईडीचे म्हणणे आहे. यासंदर्भात आ. प्राजक्त तनपुरे, आ. सुभाष देशमुख आणि आ. रणजीत देशमुख यांना समन्स बजावण्यात आले आहे. या आमदारांंसह प्रसाद शुगर अलाईड आणि अ‍ॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेड तसेच तक्षशिला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड प्रमुखांनाही न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles