Tuesday, April 23, 2024

नगरमध्ये भाजपचे लोक ठेकेदारांना खंडणी मागतात… प्राजक्त तनपुरेंचा आरोप

अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश महसुली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे अशात पाणीपुरवठा योजनेची वीज कनेक्शन कापू नयेत असे आमचे माफक अपेक्षा आहे. याबाबत आम्ही टंचाई आढावा बैठकीत वारंवार विषय मांडत आहोत, मात्र अधिकाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे गेल्या आढावा बैठकीमध्ये आम्ही जे विषय मांडले त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. उलट ज्या नवीन योजना माझ्या मतदारसंघात सुरू आहेत, त्याला भाजपचेच काही कार्यकर्ते आडवे येत आहेत आणि ठेकेदारांना खंडणी वगैरे मागत असल्याचा आरोप आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. पालकमंत्री तिकडे बैठका घेतात मात्र त्यांचे कार्यकर्ते असे आडवे येत असतील तर योग्य नाही असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटल आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles