विखे साहेब हिम्मत असेल तर ती गोपनीय फाईल जनतेसमोर आणा….तलाठी भरती घोटाळ्यावरून रोहित पवारांचे आव्हान
नगर : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये नवनियुक्त तलाठींना नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात तलाठी भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पडल्याचे सांगितले होते. तसेच विखे पाटील यांनी तलाठी भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या बाळासाहेब थोरात, रोहित पवार यांच्या आरोपांचा समाचार घेतला. तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे सिध्द करून दाखवल्यास राजकीय संन्यास घेण्याचे आव्हानही त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर आ.रोहित पवार यांनी एक व्टिट करून विखे पाटील यांनाच प्रतिआव्हान दिलं आहे.
रोहित पवार यांनी म्हटलय….
मा. @RVikhePatil
साहेब,
भरती प्रक्रियेसंदर्भात आपणास एक गोपनीय pdf फाईल DM केली आहे. आपल्याच अधिकाऱ्यांनी हा गोपनीय अहवाल सरकारला पाठवला होता, ज्यावर आपल्या सरकारने काहीही कार्यवाही केली नाही. मला हा अहवाल कसा मिळाला हे विचारू नका, कारण सरकारी यंत्रणेतही अनेक अधिकारी पारदर्शक यंत्रणेसाठी प्रयत्नशील असतात.
असो!
आपल्यात हिम्मत असेल तर ही फाईल पब्लिक करून त्यावर स्पष्टीकरण द्यावं आणि खरा महाभाग कोण हे महाराष्ट्राला सांगावं.