Wednesday, April 17, 2024

थोरल्या पवारांची मोठी खेळी….अजितदादांकडील 22 आमदार परतणार…

आमदार रोहित पवार यांनी तर अजित पवार गटाचे २२ आमदारांना पुन्हा शरद पवारांकडे परतणार असल्याचा दावा केला आहे.

जागावाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे, त्यातच अजित पवार गटाचे २२ आमदारांना शरद पवारांकडे परत यायचं आहे. तर, १२ आमदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे अशा ही चर्चाना उधाण आलं आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी तर २२ आमदारांना पुन्हा शरद पवारांकडे परतणार असल्याचा दावा केला. आमदार रोहित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना नऊ जागा मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु 9 ऐवजी आता त्यांना चारवरच आनंद साजरा करावा लागणार आहे. लोकसभेत अशी परिस्थिती असेल तर कदाचित विधानसभा निवडणुकीत घड्याळावर कोणीच उभं राहणार नाही. सर्वच भाजपच्या पक्षाकडून उभे राहतील. १२ आमदारांना तर अजित दादांनी भाजपमध्ये जावं असं वाटत असून काही आमदार नाराज आहे. त्यामुळे नाराज आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles