राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण रोहित यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. 5 जानेवारी रोजी बारामती ॲग्रोच्या पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये ईडीने सहा ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
- Advertisement -