कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवारांनी खास पोस्ट शेअर केली आहे. पत्नी कुंती पवार यांच्या सोबतचे खास फोटो रोहित पवारांनी शेअर केलेत.
माझ्या आयुष्यातली सर्वात विश्वासू साथीदार…, असा उल्लेख रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. आयुष्याच्या प्रवासात सुखाची बेरीज, दुःखाची वजाबाकी, संकटाचा भागाकार आणि आनंदाचा गुणाकार करणारा सर्वांत विश्वासू साथीदार असलेली माझी life partner कुंतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या भरगच्च शुभेच्छा!!!, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. कुंतीची आश्वासक साथ आणि हातातला विश्वासाचा घट्ट हात असाच कायम राहो, ही प्रार्थना!, असंही रोहित पवारांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.