भाजपच्या सभेला पैसे देऊन रोजंदारीने माणसं बोलावली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील त्यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केला आहे. सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप, अशी टीका देखील आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
यांना सभेला पैसे देऊन रोजाने माणसं आणावे लागतात हे आता जगजाहीर आहे, पण या गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात ते या व्हिडिओत बघा, आता एकच मिशन.. ज्यांनी खाल्ली दलाली त्यांना पाठवू घरी, असं म्हणत रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून राजकीय नेते मोठमोठ्या सभा घेत आहेत. नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अशातच भाजपकडून सभांना गर्दी जमवण्यासाठी नागरिकांना विविध प्रलोभने दाखवली जात असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.
सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप… यांना सभेला पैसे देऊन रोजाने माणसं आणावे लागतात हे आता जगजाहीर आहे, पण या गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात ते या व्हिडिओत बघा..
आता एकच मिशन..
ज्यांनी खाल्ली दलाली
त्यांना पाठवू घरी!!! pic.twitter.com/hP9kBXhE78— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 26, 2024